UNIX 2020 (Online Batch), WinDev 2021 (Online Batch)
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
सर आणि मॅडम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम !!
माझ्या कडे इतकी शब्दसंपदा नाही की मी तुमच्या करता काही लिहू शकेन, पण माझ्या भावना आणि माझा भाव तुमच्या पर्यंत पोहोचावा म्हणून मी हे धारिष्ट्य करतो आहे, काही चुकले तर माफ करा 

गाऊ गुनन कैसे तुम्हरो
गुन नाहि मोमे !!
गुनीदास गुनदान मांगत है प्रानपिया
तुम गुनसागर हो , गुन समुद्र
गुनवंत जिया !! 

मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्या कडे नशीबाने सरांचं एक युनिक्सच ऑडिओ रेकॉर्डिंग आलं, आपोआप ते ‘सतत क्रिया’ ऐकलं आणि मग युनिक्सला ऍडमिशन घायची ठरवली.
‘Bach’ (बाक) चा तो पहिला दिवस, रात्री 9 चा ऑनलाइन क्लास आणि एक प्रकारची उत्सुकता !!
इतके दिवस ज्यांना मी ऐकत होतो त्यांना *लाइव* ऐकणार, बघणार होतो !
आणि सर समोर आले , एक प्रकारचे चैतन्य अनुभवले !!
हाच तो गुरूचा सहवास. सर परंपरे बद्दल बोलत होते आणि जाणवलं पूर्वीची गुरुकुल परंपरा होती ती या पेक्षा काय वेगळी असणार?
जशी क्लास ची lectures होत होती , तशी प्रत्येक दिवशी माझ्या भोवतीची आवरणं गळून पडायला सुरुवात झाली. Sword can kill one at a time but words can kill many at a time .. हे वाक्य तर कोरून घ्यावं वाटलं, किती सहज बडबड करतो आपण हे समजलं.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ !,
*you know* चा भोपळा
आणि *IT* मध्ये चालत असलेल्या poor practices *copy paste* attitude, समोर कोड चालतोय ना येड्या मग समजून काय करायचय !
ह्या सगळ्या गोष्टी मला समजत होत्या, खूप दिवस निद्रा अवस्थेतून बाहेर येत असतानाचा फील येत होता.
किती सोपं होत होतं सगळंच ,
*जे कराल ते पॅशनने करा*
*प्रत्येक नि प्रत्येक वाक्य म्हणजे अमृत वचन !!*
सांगितीक तालीम घेत असल्यामुळे तिथे तानपुऱ्याला दिलेला मान आपोआपच इथे कॉम्पुटर , माउस , ऑपरेटिंग सिस्टिम वापरताना येऊ लागला, पहिलं धड operating system चा End User तरी बनुया ठरवलं , फुलफॉर्म माहीत केल्यावर शॉर्ट फॉर्म वापरणे हे चालू केलं , आपोआप विकिपीडिया चा बुकमार्क ब्राउझर वर आला ,तिथे जाऊन terminology oriented study करायचं ठरवलं.
सगळ्यात मोठा भ्रम दूर झाला तो म्हणजे *मला हे येतं*
वास्तविक हे असं कधीच नसतं , चालू आहे शिकतो आहे ही एक unending process की जी infinite loop सारखी चालू राहिली पाहिजे !
माझ्याच resume वरती proficient knowledge मध्ये C/C++ पाहिलं आणि स्वतःचीच लाज वाटली, आणि सरांच्या भाषेत *आपण कुठून आलो…* हे वाक्य आठवलं .
हे अनुभवत असताना त्या *कॅन्सर* पासून सर आपली मुक्तता करण्याकरीता आले आहेत हे समजत होते आणि एक positive approach आयुष्यात येऊ लागला. आपल्या पैश्यावर आपलं अश्रू, स्वेद आणि रक्त असलं पाहिजे, talk is cheap show me the code हा attitude यायला हवा . आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे हे समजू लागले.
Technology बद्दलचा आदर वाढत होता, जमिनीवर येत होतो आणि आपल्याला लायकी पेक्षा जास्त मिळत आहे हे समजत होतं.
माझं प्रलोभनांमागे पळणं थांबलं, ह्याची बूम त्याची बूम ची सरांनी केलेली थट्टा यातून जणू त्या हिरव्या दिव्यातून मला सर पाहु शकत आहेत आणि माझ्या मनात चालू असलेलं वाचू शकत आहेत असा फील आला.
सरांची गोष्ट ऐकताना त्यांचा तो प्रवास समजून घेताना आपण किती *किडा मुंगी* आहोत आणि किती लहान सहान गोष्टीना आपण achievement म्हणतो आणि किती छोट्या गोष्टीमुळे आपण negative विचार मनात आणतो हे उमजल.
आज ही जेव्हा मन खिन्न होत तेव्हा *तो* प्रवास मी आठवतो.
*अग्निपथ कविता जेव्हा सरांकडून ऐकली , नटसम्राट नाटका मधलं ते स्वगत ऐकलं तेव्हा फक्त निःशब्द आणि भरून येत होतं !*
सर आयुर्वेद, कॉम्प्युटर, ज्योतिष आणि संस्कृत मधले श्लोक हे सगळं relate करून विषय शिकवत होते आणि Knowledge is interrelated म्हणजे काय, ह्याचा उलगडा मला होत होता. त्यांचं ते अवघडाला सोपं करून समजावणं आणि माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्यांला जोवर समजत नाही तोवर तितक्याच पोटतिडकीने समजावणं ,
हे सगळं आम्हाला किती सहज मिळत होतं

Fundamental शिकत असताना आपण BE आहोत आणि उन्नती अधोगती करून पास झालो ह्याची जाणीव झाली.
खर सांगतो त्यादिवशी “पुरश्या फुकट हो” हे चितळे मास्तरांच वाक्य आठवलं .
प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य ऐकत असताना आपण किती खुजे आहोत आणि हा सगळा डोलारा कधी उन्मळून पडेल याचा नेम नाही. सर म्हणतात *इट्स नेव्हर टू लेट* तेच एक आधार देत होतं आणि अभ्यास चालू करायचा ठरवलं,
मी पुढे किती प्रगती करू शकेन हे माहीत नाही पण इतकं नक्कीच की सरांनी दिलेली शिकवण आणि त्यांनीच दिलेला मार्ग हे मला इष्ट स्थळी पोहोचवेल हा दृढ विश्वास मात्र नक्कीच आहे. सगळं सोडून अभ्यास करावा हा प्रश्न खूप दिवस त्रास देत होता पण एका lecture ला सरांनीच उत्तर दिलं,
पाण्याचा प्रवाह खूप जोरात येत असताना त्याला तोंड न देता हळू हळू diagonally पार करायचं आणि योग्य ठिकाण येईपर्यंत तो प्रयास अव्याहत सुरू ठेवायचा !
किती सोपं केलंत सर तुम्ही !!
आपल्या वर असलेल्या जबाबदारीची जाणीवही करून दिलीत आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल याचा मार्गही दाखवलात.
बाहेर गाता यावं म्हणून गुरुंच नाव लावायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते, आज सरांच नाव बाहेर सांगता यावं त्या करता भरपूर रियाज करावा लागणार हे मात्र नक्की , ते करत रहाणार , tie mentality तो सगळा भंपकपणा, काय चूक आणि काय बरोबर हे ओळखण्याची दृष्टी
हे सगळं सगळं तुम्हीच दिलत सर 
गाण्या आधी भरपूर ऐकलं पाहिजे हे म्हणजे ऍडव्हान्स करण्या आधी बेसिक कर लेका , कॉपी पेस्ट, आतपाव फुल्लस्टॅक ह्या सगळ्या मधून योग्य ते निवडण्याची दृष्टी तुम्ही दिलीत.
खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज madam आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात.
कर्नल मोड मध्ये मला हात धरुन बॅटरीच्या प्रकाशात योग्य ठिकाणी घेऊन जाणार ह्यावर निर्धास्त पणे जगणारा …………………………….
…तुमचा किडा मुंगी विद्यार्थी !
गुरुकृपा ही केवलम्
– चिन्मय दीक्षित
