UNIX 2020 (Online Batch)
UNIX ची बॅटरी आणि जीवनदर्शन
सर आणि मॅडम
साष्टांग नमस्कार,
सर, ३ फेब्रुवारी २०२१ रात्री ११:३० ला getblk algorithm झाला आणि
अंगावर काटा काढलातच (२७ Underline)
झोप तर उडवलीच…
आणि डोळ्यातून पाणी पण काढलत.
Unix सारखा दैवी विषय, बॅटरी सारखी simple उदाहरणं देत, knowledge is interrelated हे सिद्ध करत , “You know” वाल्याना चिमटे घेत आयुष्य शिकवण्याची तुमची पद्धत…. थक्क करून टाकते.
Ken Thompson, Dennis Ritchie, Brian Kernighan ह्या आधुनिक ऋषींनी जगाला कलाटणी दिलेली OS, दैवी ठरते.
Great people do simple things simply.
पण माझ्यासाठी, Great OS simplify करून शिकवणारे दैवी ठरतात.
तुमच्या Knowledge is interrelated या वाक्याचा प्रभाव इतका झाला आहे की अंतर्मनाला relate करायचा जणू छंदच लागला आहे.
त्यातून आयुष्यातले dots connect व्हायला लागले आहेत.
आयुष्यातील काही अप्रिय गोष्टींमुळे, हे असं का? असे बरेच प्रश्न मला पडायचे ज्याची उत्तर माझ्या पालकांकडेही नव्हती. मनोबल वाढवण्यासाठी मी motivational books, thoughts , अध्यात्मिक पुस्तक वाचायला लागलो. माझ्या बुद्धिनुसार त्याचे अर्थ लावले (चूक बरोबर माहीत नाही) त्यातले छान छान वाक्य एका डायरी मध्ये टिपून ठेवली.
Buffer cache च्या lecture मुळे त्यातील reading between the lines समजले.
काही लोक प्रयत्नांना सर्वस्व मानतात
“प्रयत्नांती परमेश्वर “,
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” etc.
काही लोक नशिबाला/प्रारब्ध ला सर्वस्व मानतात
यात आळशी लोक पण आले आणि प्रयत्न करून थकलेले आणि शेवटी नशीब म्हणणारे पण आले
आळशी लोकांनी corrupt केलेलं तुकाराम महाराज यांचं वाक्य आठवतं
“ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान”
यात प्रयत्न की प्रारब्ध नक्की कशावर विश्वास ठेवावा नक्की कोण superior या कित्येक वर्ष माझ्या मनात चाललेल्या द्वंद्वाला पूर्णविराम मिळाला. Period.
आपलं आयुष्य एक process आहे हे समजलं.
तुकाराम महाराज kernel mode बद्दल बोलतायत असं लक्षात आलं.
kernel ने जसे ठेविले तैसेचि समाधानाने sleep मध्ये राहावे आणि मग continue(कर्म/प्रयत्न) करावे.
सुमित्रा भावे यांच्या ‘नितळ’ चित्रपटात विजय तेंडुलकर यांचा dialogue हा user mode आणि kernel mode यांचं सह-अस्तित्व अधोरेखित करतो.
“नियती आणि इच्छाशक्ती यांचा प्रवास जोडीने होतो…”
आयुष्याचा output काढायला इच्छेचा user program आणि नियतीचा kernel दोन्ही महत्वाचे.
Kernel runs in the context of process
भगवंत भक्तांच्या माध्यमातून जगतो.
अशी तुमची एकावर एक वाक्य ऐकताना अंगावर काटा आणणे हे function recursive execute होताना वाटत होतं(काट्यावर काटा).
वडीलधारी माणसं सांगतात,
तुमच्या कष्टातून तुम्ही बरंच काही साध्य करू शकता , परंतु आयुष्यातले कलाटणी देणारे महत्वाचे क्षण , काही अप्रिय गोष्टी,वैगुण्य हे तुमच्या हातात नसतात ते विधी लिखित असतात
इथे विधी लिखित म्हणजे kernel चा code जो process ला follow करावाच लागतो तो कितीही आपटलं तरी नाही बदलणार
हे असं सगळं मनात उमटलं.
श्री गोंदवलेकर महाराजांनी साधकाला केलेला एक उपदेश Unix मुळे सोपा झाला
“यत्न कसून करीन मी , यश दे रामा
न दे तुझी सत्ता , राम हा सर्वथा कर्ता“
यत्न कसून करीन मी ,
(user mode मधले सगळे कष्ट जे तुमच्या हातात आहेत ते करा)
यश(buffer) दे रामा,
(यशासाठी प्रार्थना system call करा)
न दे तुझी(kernel) सत्ता ,
(यश (buffer) लगेच मिळेल याची guarantee नाही, ते kernel च्या सत्तेत आहे)
राम(kernel) हा सर्वथा कर्ता
हे असे सारे dots जेंव्हा connect झाले तेंव्हा त्या आनंदामुळे नाचावस वाटलं
भक्ताने आर्ततेने हाक मारली की भगवंत हाकेला साद देणारच
I requested for ANY free buffer but kernel gave me
GEOPBYTE sized buffer of Dr.Vijay Gokhle…
जेंव्हा अपयश येत (buffer मिळत नाही), दुःखी, निरुत्साही वाटत असतं तेंव्हा स्वतःचा मनोबल वाढवण्यासाठी एक शब्द getblk algorithm ने दिला
Continue (कर्म करत राहा)
भगवान(kernel) के घर देर है पर अंधेर नही (जिते रहो काम करते रहो)
इतका common शब्द पण त्यामागचा इतका मोठा अर्थ तुमच्यामुळे समजला.
बॅटरी च्या उदाहरणातुन तुम्ही kernel समजून
सांगत असता , पण खरं तर Unix ची बॅटरी घेऊन आमचा हात धरून तुम्ही जीवनदर्शन घडवत असता.
आपल्या सारखे गुरू लाभल्यामुळे , ज्ञानाच्या दारिद्र्य रेषेखालील माझ्या सारखे सुदामे समृद्ध होऊन ‘आनंदा‘ने ‘आश्रमा‘तून बाहेर पडत राहतील.
तुमचा नम्र विद्यार्थी,
ओंकार मते
(ता.क. – माझ्या आयुष्यात तुम्हाला आणणारे माझे वरिष्ठ आणि तुमचे विद्यार्थी श्री. उत्तेज पाटील यांचा मी सदैव ऋणी राहीन)
