UNIX 2019, WinDev 2020 (Online Batch)
|| श्री ||
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम साष्टांग प्रणाम,
आपल्या क्लास बद्दल किंवा सरांबद्दलचे भाव ( हो कारण भाव आणि भावना ह्या मध्ये खूप फरक आहे. एकाबद्दल भावना तयार होणे हे परिस्थितीजन्य असल्यामुळे ती तात्पुरती असल्याची शक्यता दाट असते, नव्हे ती असतेच २७ underline आणि भाव हा शाश्वत स्वरूपाचा असतो कारण तुमची नुसती शिकवण्याची नाहीच तर विद्यार्थ्याला घडवण्याची असलेली तळमळ) शब्दात मांडणे हे खरे तर माझ्यासाठी खूप अवघड असणार, कारण मुळात काही मांडणी करण्यासाठी वाचन, मनन आणि चिंतन या सर्व गोष्टींचा संबंध असणे खूप महत्वाचे असते आणि या सर्वांचा आणि माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही.
माझ्या भाग्याने लहानपणी पासून घरातील वातावरण तसे गुरु परंपरेतील असल्यामुळे म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकामुळे नकळत काही संत चरित्र वाचण्याचे पुण्य पदरी पडले असावे आणि त्यात गुरुपौर्णिमा ही कॅटॅलीस्ट म्हणून का होईना त्यामुळे ही शब्दसेवा गुंफण्याचा प्रयत्न करतोय.
खरं तर शब्दपूजा हा योग्य शब्द आहे पण ते म्हणण्यासाठी पूजेचा संबंध असावा लागतो आणि त्यात परत मग संकल्प आला आणि सध्या फक्त बाकच (OS) व्यवस्थित (? अरे मोहित तुला आरपार म्हणायचे आहे का इति बायको) केल्यामुळे, कीर्तनाचा आणि वाती वळणे हे माझ्या सद्य परिस्तिथीचे वर्णन आहे हे तुम्हाला न सांगता पण कळणार आहेच. तसा doer होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे आणि SDK च्या बॅचला ऍडमिशन घेतली आहेच.
ऑगस्ट २००६ ला Sunbeam कराडच्या DAC ला ऍडमिशन पासून, मी माझ्या BE इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशनच्या (न सांगता येणारी डिग्री! ) ज्ञानाच्या (?) धक्यातून सावरत नाही तेंव्हाच क्लासच्या नोटीस बोर्ड वर एक सूचना लागते, ती तुमच्या पहिलं lecture ची आणि तेही रात्री १२:३० ते २:३०. आणि मग तुमच्या व प्रशांत लाड सरांच्या नावाने आम्ही शंख वाजवतो. ( आता १२ वर्षाचा पुणेरी भाषेचा अनुभव त्यामुळे डिसेन्ट लिहायला जमतंय ) पण तेंव्हा खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे संगीतात आम्ही टिम्ब टिम्ब बोलून गेलो. कृपया त्याचा मनात राग मानू नये आणि आज त्या अपराधाची क्षमा मागतो. कदाचित त्यावेळच्या DAC कोर्स च्या schedule (सकाळी ७ ते रात्री १२ हो तेच ते ऑपेरेशन Successful patient डेड) च्या अवधानामुळे हा एक घोर अपराध नकळत घडून गेला.
पण त्यानंतर सुरु झालेला एक चित्त थरारक आणि मंत्रमुग्ध होणारा प्रवास! dx / dt (डेरीवेटीव्हस) काय, exponential काय त्याचा आणि मायक्रोप्रोसेसर (up म्हटलं तर तुम्ही लॅपटॉप मधून येऊन तलवार चालवलं तर) चा आणि त्याचा संबंध काय. मधेच नर्तकी येऊन raw device ड्राइवर आणि fine grained device ड्राइवर चे झालेले ज्ञान आणि मधेच “सोचलो ठाकूर” म्हणून विद्यार्थ्यांचे आत्ताच्या दशेच्या वास्स्तवाचा आरसा दाखविणारा तिखट संदेश .NET ची १३ कारणे आणि .NET च्या प्रोग्रॅमचे execution आणि CLR ( कॉमन language runtime ) चे लोंडींगचा शेवटचा क्लास झाल्यानंतरची धन्यता! आणि तुम्हाला कराड वरून निरोप देतानांचे पाणावलेले डोळे!
आणि त्यानंतर पेटून उठलेला मी (?) (झुंजूमुंजु का होईना ), तेंव्हा Java नीट कळले नव्हते पण तुम्ही सांगितलेले खालिद मुघल DAC चा schedule पूर्ण करून रात्री १ ते ३.३० वाचन करण्याचा ध्यास घेतला आणि ७ दिवसात पूर्ण केले. तुम्ही सांगितलेले CLR ( सर याच्या आधी फुल्ल फॉर्म लिहिला आहे ) चे loading, प्लेसमेंट साठी तयारी करत असलेल्या माझ्या batch च्या सर्व विद्यार्थाना शिकवले आणि ते आजही लक्षात आहे!
परंतु BE मध्ये झालेलं YD चा इतिहास कपाळावरचा पुसल्या जात नव्हता. सत्यम, HSBC , जॉन डिअर आणि सिग्मा या सर्वांचे interview crack करून पण HR मध्ये मार्कशीट दगा देत होती. परंतु तुमच्या प्रेरणेनें SNS ( सर फुल्ल फॉर्म नाही आहे) आत्ताची ForgeAhead ने Java ची subjective टेस्ट घेतली आणि तब्बल ४२ interview नंतर ऑफर लेटर हातात आले.
त्यानंतर इच्छा असूनही म्हणा तर कधी कंपनीच्या कामाच्या वेळेमुळे म्हणा ( खरं तर हातात येणाऱ्या छम छम मुळे) क्लास लावता आला नाही. परंतु बिद्युत सोबत कराड ला मॉक interview साठी जाताना मनात एक चपराक बसत होतीच. पुढे ऑस्ट्रेलिया ला जाण्याची संधी मिळाली आणि २०१४ ते २०१९ जवळपास ५ वर्षे कामाचा छान अनुभव आला. बाकीचं जरी सगळे सोडले, परंतु तिथे तुमच्या कामाची आणि मेहनतीची कदर होते. मॅनेजर हा तुम्हाला विचारून क्लायंट सोबत गोष्टी फायनल करतो आणि तिथे कोणी तुमचा क्रेडिट खात नाही. हा माझा अनुभव होता. असो असेही असले तरी मूळ उद्देश हा पैसा आणि कर्ज फेडून येणे. If you dont love your job, take home loan, You know! .(सर You know वाले पण हे एक्स्प्रेशन वाचतील तर त्यांना पण थोडं बर वाटेल)
पेरेंट्स मुळे पण परतीचे प्रयत्न सुरु होतेच आणि RTR च्या एका youtube वरील कार्यक्रमाने मनाचा परत एकदा वेध घेतला. श्रेणिक सोबत व्हाट्सअँप आणि ई-मेल वरून यूनिक्स च्या dates ची माहिती घेत होतोच. ७ डिसेंबरला २०१९ बरोबर सकाळी १० वाजता पुण्यात पोहोचलो आणि यूनिक्स ची ऍडमिशन फायनल झाली.
जणू काही १२ वर्षांच्या एक कॅन्सरमय (हो, तो असतो आपल्याला कळत नाही यूनिक्स ला येई पर्यंत ) तपश्चर्ये नंतर ती संधी मिळाली होती. अरे मोहित तू तर .Net मध्ये काम करतो मग यूनिक्स करून काय फायदा? (इति अतिपरिचयात अवज्ञा). मग मला DevOps कडे जायचा आहे अशी कधी वेळ मारून उत्तर देणे किंवा .Net core ला कामी येईल असे सांगून त्यांच्या प्रश्नाचे समाधान व्हावे. ५ वर्षे on-site नंतर पुण्यात कार चालवणे हे किती किचकट आहे हे पण शिकलो. १० तास जॉब करून यूनिक्स अटेंड करणे ते पण मिड-life क्रायसिस असताना तसा टिकाव लागणे कठीण आहे हे स्पष्ट दिसत होतं. परंतु तो सगळा थकवा एकदा का तुम्ही आनंदाश्रमात पाऊल टाकलं कि कुठे पळून जायचा त्याचा थांग पत्ता पण लागत नव्हता. असा धरी छंद | जेणे तुटतील रे भवबंध ||
आनंदाश्रमातलं वातावरण, तिथली स्पंदन आणि विद्यार्थ्यांवर तिथे घडणारे संस्कार या सगळ्यांच्या तिहेरी मिश्रणा मध्ये आपल्यातला मनात कुठे तरी साठलेला अहंकार, अनुभवाची ताठरता आणि ऑन साईट रिटर्न चा गर्व सर्व विरून जातो. गुरु ऐसा सुरमा | नख शीख मारे पूर | बाहर घाव दिसत नई | अंदर चकनाचूर ||
मग त्याची जागा गुरुकुलातील विद्यार्थी घेतो , मेहनत, रक्त आणि घाम यांच्यावर परत विश्वास बसायला सुरवात होते आणि अभ्यासात, शिकण्यात आणि जाणण्यात काय समाधान आपल्याला मिळतेय ते आपल्यालाच कळत ,उमगत. येथोनि आनंदु रे आनंदु. आणि मग ये दिल कि बात है मुरली इसे सिर्फ दिलवाले ही समझ सकते है याचा अनुभव यायला लागतो (एक्सपेरियन्स! Mr. वॉटसन )
आणि जेंव्हा आम्ही सगळे विध्यार्थी एका लयीत येतो ( कोण कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे, कुणाला किती अनुभव आहे हा फरक तिथे उरत नाही ) तेंव्हा पुन्हा सुरु होतो परत एक मंत्रमुग्ध आणि मनाला समाधान देणारा प्रवास!
हार्ट बीट मधून कळणार OS बूटिंग, रिअल मोड, प्रोटेक्टड मोड आणि अ२० द्वार , थिएटर मधील बॅटरी वाला कर्नल , पोळी भाजी आणि इडली सांबर मधून कळणार buffer cache , लाल हिरवे आणि पिवळे दिव्यामधून व्यक्त होणारी प्रोसेस , लाल आणि हिरव्या दोऱ्यावरून उकलत जाणार iNode चे डेटा structure . गर्भधारणेतून कळणारी प्रोसेस ची life सायकल आणि इव्हेंट मधून समजणारे सिग्नल. च्यायला ९ वा चॅप्टर (इति गुह्यतमम शास्त्रं!) लय घाण ( परत भेटूच repeater म्हणून! )
सर आपण टेकनॉलॉजि मधील असे प्रॉडक्ट झालात की जे कॉम्पुटर मधील एक मानांकन (स्टॅंडर्ड) झाले आहे आणि या स्टॅंडर्ड मधून बाहेर निघणारे प्रॉडक्ट ( प्रज्ञा, योगेश्वर सर , पियुष सर, शशी सर, सोनाली मॅडम, जितेंद्र सर आणि योगेश सर, श्रेणिक, निहारा ) हे पण एक स्टॅंडर्ड म्हणून आज आपलेच कार्य पुढे चालवत आहेत .
संत रामदास स्वामींनी सांगितल्या प्रमाणे, शिष्यास गुरुत्व प्राप्त होये | सुवर्णे सुवर्ण करिता नये || किंवा as per सेंट मॉरीस बाक Unix is a Product which later become standard. It became such a standard whose product later become स्टॅंडर्ड.
Knowledge is Inter-releated.
व्यक्त होण्यासारखं बरंच आहे, सांगण्यासारख खूप आहे पण हा सांगण्याचा विषय नसून अनुभवण्याचा आणि जाणण्याचा मार्ग आहे. हे सगळे व्यक्त होत असताना माझ्या हातून नकळत चुका झाल्या असतील नव्हे असाव्यातच पण मी ही सेवा केवळ एक लेखणी म्हणून करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याचे प्राकट्य माझ्या जवळचे काही नसून सरांच्या सिद्ध वाणीतून आलेले आहेत, त्यामुळे सुज्ञ वाचकांनी झालेल्या चुका पोटात घेऊन हे बोबडे बोल स्वीकारावे अशी प्रार्थना करून लेखणीस विराम देतो.
सर, मॅडम आणि सर्व विद्यार्थाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. :pray: :pray: :pray:
आपलाच सदैव ऋणी,
मोहित धर्माधिकारी.
किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च । दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥
