सौ. ज्ञानदा प्रसाद पैठणकर ह्या प्रसाद पैठणकर ह्या विद्यार्थ्याच्या पत्नी आहेत.
प्रसादने ॲस्ट्रोमेडीकॉम्प मध्ये – UNIX 2012, WinDev 2013, RTR 2017 (RTR 1.0) – हे Courses पूर्ण केलेले आहेत. सध्या नव्यानेच सुरु झालेला “Advanced Real-Time Rendering” (ARTR) Course करत आहे.
==========================================================================================
ऑगस्ट २०२५ मध्ये डॉ. सौ. रमा विजय गोखले मॅडम ह्यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेतली गेली होती. त्या मुलाखतीवर उमटलेली ही प्रतिक्रिया …
==========================================================================================
आदरणीय मॅडम,
सुरवात काय करू समजत नाही लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण हिंमत करून तुमच्या साठी चार शब्द लिहितेय.
चूक भूल माफ करा.
सोपं नसतं
एका महत्वकांकशी शिक्षका ची बायको होणं !
एखादा गजरा
बायकोला घेऊन द्यावा
एवढी समयसूचकता
असलेला नवरा
कॉम्प्युटरसमोर आणि कोडींग
मन लावून करत बसतो !….
घरी सांगितलेल्या वेळेवर
कधिही न येणारा नवरा
काट्यावर काटा आल्याबरोबर
क्लास मध्ये मात्र उभा असतो !……
घरात सणवार असो
की पाव्हणेरावळे
आनंदाश्रमात भेटतात यांना
सगेसोयरे !
जगावेगळा माणूस असा
शांत राहून फक्त पाहाणं…
सोपं नसतंच मुळी….
अश्या महत्वकांशी शिक्षका ची बायको होणं !
लग्नात आपण घेतो फेरे,
एकमेकांना वचन देतो,
पुरुषार्थ सगळे करण्यासाठीच
गृहस्थ म्हणून दीक्षा घेतो !
आपण समाजाच विध्यार्थ्यांनच ऋण मानणं
हा याचा धर्म असतो,
ऐहिक प्राप्तीत अनेकदा
चार पावलं मागे असतो !
रविवारी सुद्धा काम आणि मुलांसाठी आनंदाश्रमात जाणं !
सोपं नसतंच मुळी
महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
काय पाहतो आपण फार ?
साधीसुधी माणसं आणि खातंपितं घर !
निर्व्यसनीपणाची त्यात असावी भर !
घरात जरी माणसं दिसली चार,
आई, माई म्हणणाऱ्यांचा राबता असतो फार !
कोणत्याही वेळी येण होतं सरावाचं येणं !
सोपं नसतंच मुळी महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
लक्ष नसतं संसारात
पण विस्तार त्याचा मोठा !
माणसांच्या श्रीमंतीचा
कधी नाही तोटा !
शिकवण्याच्या कलेत
मन तृप्त करून जातं,
सोपं नसतं महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं!
व्यक्ती घडत जाते आणि
समाज मोठा ठरतो !
मी माझं दूर सारून
पोर घराबाहेर पडतो !
भारावलेलं जिणं त्याचं
ढगाएवढं असतं काम,
कोण म्हणेल कलीयुगात
कुठे आहे सीतेचा राम?
विचाराने भारून जातात
नसतं कसलंच भान !
पाठी उभं राहाणं त्यांच्या
एवढंच असतं आपलं काम !
सेतू भव्य बांधतात सारे
त्यात थोडं खारूताईचं देणं !
असंच असतं मुळी….
महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
ही कविता माझी नाही वाचली एका ठिकाणी त्यात बदल केले आणि कालची मुलाखत ऐकून सुचत गेले.
* मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा *
11 वर्ष झाली लग्नला भेटायचा योग नाही आला. पण खुप जुनी ओळख आहे काल हा भास झाला.
अहो (प्रसाद )आमचे थकत नाहीत. तुमच्या दोघां बद्दल सांगताना. कौतुक वाटत ते सगळं ऐकताना.
गुरु विषयी ची ओढ आता पर्यंत जाणवत होती. आपण तेवढीच आई (तुमच्या बद्दल) बद्दल ची ओढ या वेळी जवळून
बघितली.
सर न चा शब्द प्रमाण असं फक्त विध्यार्थी च नाही तर तुम्ही म्हणता हे काल मुलाखती मधून जाणवलं. आणि भेटण्याची
ओढ वाढवत गेलं. नुसतं ऐक असं म्हणाले होते. पण ऐकताना त्यात मीच रमून गेले होते.
Coding आणि C ह्यातलं मला काहीच समजत नाही येत नाही खरंच तर पण आता वाटत की मला पण कोणी असं
मार्गदर्शन करणार मिळालं असतं तर..
परवा चा कार्यक्रम खुप छान झाला ज्ञानदा पण मला वेळ नाही ग देता आला. असं ह्यांच म्हणणं मला समजलं च नाही.
पण तुमच्या मुलाखती मधून समजलं ज्ञानाच्या महासागरा समोर आपण कोणीच नाही.
Apple चा फोन का नाही घायायचं या वर खुप चर्चा झाली. पण हे कायम म्हणतात
सरां नी सांगितलं आहे code कर मग घे. हे फक्त वाक्य वाटायचं मला. पण प्रज्ञा नी पण coding करून फोन कमवला ते
काल समजलं आणि हे म्हंटले ते पटलं.
तुमच्या सल्ल्या शिवाय निर्णय घायचा नाही ह्याची प्रचिती आली काल आणि मन शांत झालं.
खोटं नाही बोलणार तुम्ही दोघ माहित नव्हता मला आजून पण पूर्ण माहित नाही.
खुप चीड चीड व्हयची ह्यांच्या वर किती उशिरा पर्यंत कंटाळे मीं खुप वाद व्हायचे काल तुम्हाला ऐकून असं वाटलं की
आपण जे वागतोय ते किती चूक आहे. तुम्ही जे केलंय सरांन साठी त्यांच्या बरोबर ते बघून तर भारावून गेले आणि
उमगल आपल्याला तर काही च करावं लागत नाही आहे.
तुम्ही जशी सर ना साथ देत आहात तशीच जमेल मला माहित नाही प्रयत्न नक्की करेन.
काल कोणाला काय मिळाल माहित नाही मला आपण स्त्री म्हणून आपण किती भूमिका नवऱ्याच्या आयुष्यात पार पडतो.
हे मात्र समजलं. सोपं नाही माझ्या साठी पण प्रयत्न नक्की करेन..
सर सगळ्यांचे च गुरु आहेतच. पण आज गृहिणी आई बायको सून मुलगी म्हणून कसं वागायचं राहायचं या साठी माझ्या
साठी तुम्ही गुरु आहात. कायम असाल.
खुप धन्यवाद !!!
लवकरच भेटायचा योग यावा आणि तुमच्या ज्ञानाच्या महासागरा चा आनंद मला ही घेता यावा ही इच्छा !!!
*कृतार्थ*
सौ. ज्ञानदा प्रसाद पैठणकर.
